६० नक्षलविरोधी पथकातील एक जवानाचा तलावात बुडून मृत्यू





घोट : जिल्हा पोलिस दलातील अत्यंत महत्त्वाच्या सी. ६० नक्षलविरोधी या पथकातील एक जवान तलावात बुडाला होता. २४ तासांनंतर त्याचा मृतदेह ५ एप्रिल रोजी तलावातील पाण्यावर तरंगताना आढळला. ही घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी - येथे घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आकाश मुन्सी लेकामी (वय ३०, रा. पिपरी, ता. एटापल्ली), असे मृत जवानाचे नाव आहे.


आकाश लेकामी हे जिल्हा पोलिस दलाच्या सी-६० या नक्षलविरोधी अभियान पथकात कार्यरत होते. पत्नी माहेरी असल्याने ते ४ एप्रिल रोजी एक दिवसाची सुटी घेऊन सासरवाडीत अडंगेपल्ली येथे गेले होते. रेगडी येथील कन्नमवार तलावात ते ४ एप्रिलला दुपारी तीन वाजता पोहण्यासाठी एकटेच गेले. यावेळी त्यांनी पाण्यात उडी घेतली, पण त्यानंतर वर आलेच नाही. इकडे नातेवाइकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; पण ते सापडले नाहीत. ५ एप्रिलला त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. रेगडी पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक कल्पेश मगरे तपास करत आहेत.


कुटुंबाचा आक्रोश

आकाश लेकामी हे मोठ्या मेहनतीने पोलिस दलात भरती झाले होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह आढळल्यावर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.


Post a Comment

Previous Post Next Post