पत्रकारांवरील हल्ले खपवून घेणार नाही : अजित पवार




पुणे : महाराष्ट्राच्या पत्रकारांवर होणारे हल्ले निषेधार्ह असून संस्कृतीला हे शोभणारे नाही. यापुढे हल्ले झाल्यास गप्प बसणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. खोक्यावर गाणे करणाऱ्या राज मुंगसे या तरुणाला अटक करून सरकारने एकप्रकारे कबुलीच दिलीअसल्याची टिप्पणी पवार यांनी केली.






लोकमित्र प्रकाशनच्या वतीने श्याम दौडकर लिखित 'धडपड' या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसेनानी अमरसिंह जाधवराव, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि पवार यांनी दिला. प्रकाशक चंद्रकांत भुजबळ या वेळी उपस्थित होते.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ले होत आहेत. रिफायनरीला विरोध करणारी बातमी दिल्याबद्दल एका पत्रकाराची हत्या करण्यात आली. पालकमंत्र्यावर शाईफेक झाल्याचा प्रकारात पत्रकाराला अडकवण्याचा प्रयत्न झाला. असे प्रकार सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे नाहीत. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या आणि पत्रकारांना बदनाम करणाऱ्यांना कधीही माफ केले जाणार नाही, असा इशारा पवारांनी दिला.

दौंडकर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप  देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post