रमेशगुडम परिसरातील समस्या शासन दरबारी मांडून पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन-संदीप कोरेत


महाराजस्व अभियान कार्यक्रमात दिले आस्वासन


 अहेरी:- सिरोंचा तालुक्यातील महसूल विभागाचच्या वतीने काल दिनांक ३१ मे रोजी  महाराजस्व अभियान कार्यक्रम पार पडला असून  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  संदीप भाऊ कोरेत भाजपा प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी कार्यकारी जिल्हा अध्यक्ष यांनी उपस्थित होते.
संदीप कोरेत यांच्या हस्ते विविध प्रकारचे प्रमाणपत्र नागरिकांना वाटप करण्यात आले.

 या प्रसंगी  शासन कडून राबविल्या जाणारे विविध योजना बद्दल सविस्तर माहिती बद्दल मार्गदर्शन केले, त्या परिसरातील समस्या जाणून घेऊन, एक एक समस्या शासनापर्यं  पोहचऊन ते मी पूर्ण करण्याच्या प्रयत्न करीन असे आस्वासित केले आहेत. कार्यक्रमात या भागातील कमीत कमी 200 ते 250 लोक उपस्थिती होते, सोबत  अमित भाऊ बेझलवार, जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद संतोष चंदावार, सामाजिक कार्यकर्ते, राजमल्लू मानेम, सामाजिक कार्यकर्ता कुमार स्वामी मडावी, हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post