पतीशी अनैतिक संबंधामुळे पत्नीकडून महिलेची हत्या


(संग्रहित फोटो)
ठाणे : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गीता यादव ( ३६ ) या महिलेने मनीषा पांडे ( ३० ) हिच्या अंगावर उकळते तूप ओतून पतीशी तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकमान्यनगर भागात हा प्रकार घडला होता . उपचारादरम्यान ६ मार्च रोजी मनीषाचा मृत्यू झाल्याने तिची आई मीरा खिरदेकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल केला . लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती तर ज्ञानेश्वरनगर भागात गीता वास्तव्याला आहे . पतीचे मनीषासोबत अनैतिक संबंध असल्याचा गीताला संशय होता त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते . मनीषा ही कामानिमित्ताने २३ जानेवारी २०१२ रोजी तिच्या माहेरी गेली होती . त्याचवेळी अचानक गीताने मनीषाला जेवण बनविण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले . त्यामुळे मनीषा तिच्या लोकमान्यनगर येथील घरी पोहचली . घरात जेवण बनवित असताना गीताने उकळते तूप तिच्या अंगावर ओतले . यात ती गंभीर जखमी झाली . तिला लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते गीताला अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले .

Post a Comment

Previous Post Next Post