वीज ग्राहकांना पूर्वसूचना नोटीस न देता वीज पुरवठा केला जातो खंडीत - वीज वापर करणारे ग्राहक झाले त्रस्त...! - देसाईगंज विद्युत वितरण कंपनीचा महाप्रताप


                 (संग्रहित फोटो)
सत्यवान रामटेके(गडचिरोली प्रतिनिधी)
देसाईगंज :- विद्युत वितरण कंपनी वीज पुरवठा करणाऱ्या ग्राहकांना १५ दिवसांची पूर्वसूचना नोटीस न देता कंपनीतील अधिकारी व कर्मचारी वर्ग सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करीत असल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील वीज वापर करणारे ग्राहक देसाईगंज विद्युत वितरण कंपनीच्या महाप्रतापामुळे त्रस्त झाले आहेत.
विद्युत वितरण कंपनी कायदा २००३ च्या कलम क्रमांक-५६ नुसार कोणत्याही वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याअगोदर सर्वप्रथम बिलावरील भरणा करण्याची अंतिम तारखेची मुदत संपल्यानंतर १५ दिवसांची पूर्वसूचना नोटीस देणे अनिवार्य आहे.अशा नोटिसामध्ये कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.त्यानंतर १६ व्या दिवशी वीज ग्राहकांना कोणतीही सूचना न देता वीज पुरवठा खंडित करता येतो.मात्र देसाईगंज विद्युत वितरण कंपनी तसे न करता कोणत्याही प्रकारची १५ दिवसांची पूर्वसूचना नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करीत असल्याने वीज ग्राहकांसाठी दिलेल्या विद्युत वितरण कायद्यातील कलमाचे उल्लंघन करून वीज पुरवठा ग्राहकांचे अधिकार डावलीत आहेत.
कित्येक शेतकरी,मजूर वर्ग,सर्वसामान्य नागरिक व इतर नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने विद्युत वितरण कंपनीतील अधिकारी,कर्मचारी वर्ग मुदत न संपता वा कुठल्याही प्रकारची कागदोपत्री १५ दिवसांची पूर्वसूचना नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करीत असतात.मात्र विद्युत वितरण कंपनी कायदा २००३ नुसार वीज ग्राहकांच्या अधिकारांचाही उल्लेख केला गेला आहे व असे अधिकार विद्युत वितरण कंपनी नाकारू शकत नसल्याने वीज ग्राहकांनी जागरूक होणे गरजेचे आहे.
१५ दिवसांची पूर्वसूचना नोटीस न देताच विद्युत पुरवठा खंडित केला गेला तर विद्युत वितरण कंपनीला धारेवर धरून कारवाई करण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे.अन्यथा 'ना घर के ना घाट के'अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जागरूक होऊन विद्युत वितरण कंपनीला पूर्वसूचना नोटिसाबद्दल जाब विचारणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post