*होळी निमित्त* तो औलाद नसेल भिमाची...

*होळी निमित्त*

तो औलाद नसेल भिमाची...

रंग उधळणारी ही रंगपंचमी
आपल्या काय हो कामाची
ज्याला हौस असेल होळीची
तो औलाद नसेल भिमाची

महापुरुषांची कत्तल करून 
झालीय निर्मिती सणांची 
पिचकारी फुगे रंग चकाकी 
निशाणी रक्तरंजित आई-बहिणींची 

आज जाळतात लाकडे जी 
कधीकाळी जाळली होती ती माणसे
कधी येतील मेंदूच्या भुईवरी
मंगल विचारांची कणसे

जळत्या होळी भोवती फिरून 
आज तू ओरडतोस हसून 
कधीकालच्या कानखिळ्या बसविणाऱ्या 
किंचाळ्या होत्या त्या बाप दादांच्या

इतकं सारं ठाव असुनी
किंमत नसेल तुला घामाची
तरीही ज्याला हौस असेल होळीची
तो औलाद नसेल भिमाची.... 
           
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ही कविता होळीच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक भिम सैनिकाला जाग आलीच पाहिजे.
         🙏🏻🙏🏻🙏🏻
       ✍️अमित जनबंधू
 लाखांदूर,जिल्हा भंडारा

Post a Comment

Previous Post Next Post