किर्तनकाराचा ‘ तो ‘ व्हिडीओ अखेर कसा झाला व्हायरल ?

औरंगाबाद :- जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘ तसला व्हिडिओ ‘ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत असून हा व्हिडीओ बाहेर आला कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र याचं खरं कारण आता समोर आलं असून बाबाचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे .

किर्तनकार महाराजांचे कीर्तन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते त्यावेळी सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि यापूर्वीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा आणि आम्हाला ते व्हिडीओ ग्रामस्थांना दाखवता येतील असे ते म्हणाले त्यावर महाराजाकडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत तो भलत्याच कार्यक्रमाचा व्हिडिओदेखील चुकून पाठवला गेला आणि तो व्हायरल झाला.

समाजामाध्यमाने या महाराजाला एका मोठ्या उंचीवर नेले होते. मात्र ज्या समाजमाध्यमाने या महाराजांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली त्याच समाजमाध्यमावरून महाराजाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत तर व्हिडिओतील महिलेने विष देखील घेतले आहेत तर या कीर्तनकाराने असा प्रकार करू नये म्हणून त्यांच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

व्हिडिओमध्ये महाराजांसोबत ‘शरीरसंबंध’ ठेवताना दिसणारी महिला सुद्धा त्यांच्याच क्षेत्रात काम करणारी औरंगाबाद जिल्ह्यातील त्यांची सहकारी असून महिलेने नशा केला असावा असे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओतील महिलेला स्पष्टपणे बोलता येत नव्हते आणि सतत डोक्याला हात मारुन डोकं दुखत असल्याचं व्हिडिओतील संभाषणत दिसत आहे. व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे पण स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र कीर्तनकार महाराजांच्या अब्रूची लक्तरे यामुळे सोशल मीडियावर लटकली.


💐एका महिन्यात 3 लाख वाचकांनी लोकप्रिय सुपर फास्ट बातमीला भेट दिली💐

              👇👇👇👇

Post a Comment

Previous Post Next Post