मारेगाव येथे कॉमिनिस्ट भाई नथ्थु पाटील किन्हेकर स्मृती सभागृहाचे थाटात उद्घाटन*

यवतमाळ/ परशुराम पोटे

मारेगाव येथे भारतिय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय काॅ.नथ्थु पाटील किन्हेकार स्मृती सभागृहाचे थाटात भाकप नेते कॉ.भालचंद्र कांगाे यांचे हस्ते उद्घाटन करून लोकार्पन करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय रायपुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन भाकपचे राज्य सचिव कॉ.तुकाराम भस्मे, पि.के. टोंगे, आयटक जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, प्रा.नामदेव कन्नाके,पांडुरंग काेल्हे,प्रा.करमसिंग राजपूत उपस्थित होते. याप्रसंगी राजपुत सरांचे लिखीत व म.रा.किसान सभा द्वारा प्रकाशित "कापसाची कुळकथा आणी कापूस उत्पादकाच्या व्यथा"या पुस्तकाचे काॅ.भस्मे यांचे हस्ते विमाेचन करण्यात आले.सोबतच कायाॆलय उभारणीत भरीव मदत करणारे गणेशभाऊ गुंडावार,धनराज अडबाले,मोरेश्वर कांबळे,अनंता पेंटर,भालचंद्र हिकरे,पांडुरंग कोल्हे,डाॅ.यशवंत आंबटकर यांचा सत्कारही करण्यात आला. कायॆक्रमाची प्रस्तावना प्रा.धनंजय आंबटकर यांनी,संचालन सुनिल गेडाम यांनी तर आभार प्रदशॆन बंडु गोलर यांनी केले.
सोहळ्याला भाकपसह सर्वच पक्ष कायॆकते,सहानुभूतीदार,देनगीदार,नथ्थु पाटील यांचे परिवारातील सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post