चक्क पुजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याची शिकार बिबट्याने केली



फाईल फोटो
लाखांदूर : झुडपात दबा धरून बसलेला बिबट्याने चप्राड पहाडीवरील दुर्गामाता मंदिराच्या पुजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजता घडली. हा प्रकार मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

लाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडी येथे दुर्गामातेचे प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानात शेकडो भाविकांची दररोज वर्दळ असते. तेथे गौतम नावाचे पुजारी असून, मंदिर परिसरात निवासस्थान आहे. सोमवारी रात्री एका बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली. हा प्रकारसकाळी उघडकीस आला. सीसीटीव्हीत बघितले असता एक बिबट्या कुत्र्याची शिकार करत असल्याचे दिसून आले.

पहाडीवर मोठ्या झुडपी जंगल आहे. शिकारीच्या शोधात प्राणी या झुडपात दबा धरून असतात. काही दिवसांपूर्वी दुर्गामाता मंदिर परिसरात अस्वलाचे दर्शन झाले होते. या अस्वलाचे दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाले होते. आता कुत्र्याची शिकार झाल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाविकांनी वनविभागाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post