भाऊ नकली दारू बनवायची आहे का ? मग बघा युट्युब

अकोला : अकोल्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला बनावट देशी दारूच्या कारखाना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून उदध्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक लाख रूपयांचा मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे, युट्यूबवर व्हिडीओ पाहून या आरोपीने दारू तयार केल्याचे उघड झाले आहे.
अकोल्यातील बेलुरा खुर्द येथील एका घरात स्पिरिट, अल्कोहोल इसेन्स मिक्सकरून बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने दारूबंदी अधिकारी आणि पंचासमक्ष धाड टाकून कारवाई केली.

दरम्यान पोलिसानी बनावट दारुसह दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसानी सुभाष डाबेराव, दिनेश डाबेराव, बजरंग डाबेराव, राहुल बरगे या चौघांना ताब्यात घेतले आहे.
या चौघांबरोबरच बनावट दारू विक्रीसाठी साहाय्य करणाऱ्या आंध्रप्रदेशातील आणि सध्या अकोल्यात वास्तव्यास असलेल्या श्रीनिवास करैया गारी याला सुद्धा ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पातूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून देशीदारुच्या खाली बोटल 100 नग, बॉटलचे झाकने बुच 1800 नग, 2 सीलिंग पैकिंगच्या मशीन , अल्कोहोल 10 लीटर, सर्जिकल स्पिरिट 5 लीटर , केमिकल्स 10 लीटर, बनावट देशीदारु बनविलेल्या 250 बॉटल, असा एकूण एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
विशेष म्हणजे, दारू बनवणारा हा तरुण थोड्याफार प्रमाणात दिव्यांग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा तरुण जरी दिव्यांग असला तरी, तो कश्या प्रकारे युट्युब वरून ही बनावट दारू बनवू शकतो याच प्रात्यक्षिक पोलिसांना करून दाखवलं आहे. तो जरी दिव्यांग असला तरी, मेडिकली फिट असल्याचं प्रमाणात पत्र पोलिसांकडे आहे.
ही बनावट दारू कशी बनवली जाते. या बनावट दारूमध्ये अल्कोहोल, सर्जिकल स्पिरिट, इसेन्स आणि पाणी मिक्स करून त्यात वेगवेगळे प्रतिबंधीत केमिकल्सचा वापर करून बनावट देशी दारू बनविली जाते. देशी दारूच्या दुकानातील रिकाम्या बॉटल गोळा करून, बाजारामधून रेडिमेड झाकण विकत आणून ही बनावट दारू त्या बॉटलमध्ये मशिनद्वारे सीलबंद केली जाते. आणि ही बनावट दारू बाजारात सप्लाय केली जाते. पोलिसांनी यावर छापा टाकल्याने या बनावट कारखान्याचा भांडाफोड केला आहे.
जास्त प्रमाणातील सर्जिकल स्पिरिट, अल्कोहोल आणि वेगवेगळे केमिकल शरीरासाठी हानिकारक असतात. मात्र चार पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जीवाची परवा न करता अश्या प्रकारे बनावट दारू बनवली जाते. हा एक कारखाना पोलिसांना माहिती मिळाल्यावर उदध्वस्त करण्यात आलाय, मात्र असे अनेक कारखाने असू शकतात, म्हणून यावर प्रशासनाने अंकुश लावणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post