पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

ब्रह्मपुरी :- मुलांचा मानसिक शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने मागील ६ वर्षापासून पी.आर.डी. स्पोर्ट्स,ब्रह्मपुरी हे क्लब ब्रह्मपुरी शहरात कार्यरत आहे पी.आर.डी. स्पोर्ट्स च्या माध्यमातून ब्रह्मपुरी शहरातील अनेक विद्यार्थी राज्य , राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले तर कित्येक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले पी.एस.आय., पोलीस, फॉरेस्ट,आर्मी , व अन्य क्षेत्रात पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चे संस्थापक मा. राहुलजी जुआरे सर यांच्या मार्गदर्शनात रुजू झाले पण एवढ्यावरच न थांबता हे विजयी शृंखला सातत्याने कायम राखत दिनांक ३० व ३१ जुलै २०२२ ला *महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन चंद्रपूर जिल्हा* द्वारा विसापूर येथील भारतरत्न.अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या अँथलेटिक्स स्पर्धेत ब्रह्मपुरी शहरातील पी.आर.डी. स्पोर्ट्स च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली यात १४ वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर दौड स्पर्धेत ७ सेकंद ०४ मायक्रो सेकंद वेळ नोंदवत कु.ओजस नाकाडे याने प्रथम क्रमांक तर १६ वर्षाआतील मुलांच्या गटात ३०० मीटर दौड स्पर्धेत ४३ सेकंद वेळ नोंदवत कु.संकेत बारसागडे याने द्वितीय क्रमांक मिळविला तर १४ वर्षातील गटात गोळाफेक स्पर्धेत ६.२०मीटर गोलफेक करत कु. मृण्मय बारेकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला
तसेच १४ वर्षातील मुलांच्या गटात ३.६०मीटर लांबउडी घेत कु.अभिजीत किरमिरे याने द्वितीय क्रमांक तर प्रसाद धकाते याने ३.५० मीटर लांबउडी घेत तृतीय क्रमांक मिळविला शंतनु देव्हारी याने १०० मीटर दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला विजेत्या सर्व खेळाडूंचे पी. आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी तर्फे आज दिनांक २ ऑगस्ट २०२२ ला सायंकाळी ६:०० वाजता, एन. एच. ग्राऊंडवर आयोजित सत्कार सोहळ्यात सत्कार करण्यात आले या सत्कार सोहळ्यास उद्घाटक म्हणून मा.एँड. हेमंतजी उरकुडे साहेब उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून मा. डॉ. नरेशजी देशमुख सर व प्रमुख अतिथी म्हणून मा. भाऊरावजी राऊत सर , मा.चंदूजी भेदे ,मा. आनंदजी शिवुरकर सर , मा.कुणाल धकाते सर ,मा. प्रवीण बन्सोड ,मा. धनपाल मलोडे सर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नरेश देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना व्यायामासोबत पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिले तर अध्यक्षीय मार्गदर्शनात एँड.हेमंतजी उरकुडे सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये खेळाची भावना महत्त्वाची आहे व त्याचे आपल्या जीवनात अनमोल असे फायदे आहेत याबद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय आई-वडील व पी.आर.डी. चे संचालक व प्रशिक्षक राहुलजी जुआरे यांना दिले
या कार्यक्रमाचे संचालन राहुल जुआरे तर प्रास्ताविक मुन्नीराज कुथे व आभार सुरज पडोळे यांनी मानले याप्रसंगी सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post