टिव्ही बघत असतांना घराची भिंत कोसळून पत्नीचा मृत्यू झाला तर पती, मुलगी गंभीर जखमी

चंद्रपूर : टिव्ही बघत असतांना घराची भिंत कोसळली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर पती, मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. ही दुदैवी घटना बल्हारपूर शहरात घडली. वनिता योगेश पुणेकर असे मृतक महीलेचे नाव आहे. या दुदैवी घटनेने शोककळा पसरली आहे.

बल्लारपूर येथील मौलाना आझाद वॉर्ड टेकडी विभाग येथील वनिता योगेश पुणेकर (36) रात्री साडे नऊ वाजता टीव्ही पाहत असतानाच अचानक पणे भिंत अंगावर कोसळून पडल्याने मृतक वनिता जाग्यावरच मृत्यू पावली त्यात तिची लहान मुलगी (11) व पती योगेश पुणेकर (39) दोघेही बाप बेटे गंभीर जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे, वॉर्डात दुःखाचे पहाड कोसळलेले आहे.

तहसीलदार संजय राईचवारयांची प्रतिक्रिया घेतली
असता त्यांनी सांगितले की त्यांचे सेवानिवृत्त
झाल्याने त्याचा ठिकाणी जगताप मैडमतहसीलदार घटनास्थळी येणार आहे प्रशासनाच्या वतीने जे काही मदत मिळणार ते त्यांना देण्याचा पुरेपूर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मृतक चा पतीला सिकलसेल आजाराने ने ग्रस्त आहे. मृतक ला दोन मुले आहे एक मुलगी एक मुलगा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post