नायब तहसीलदार लाच घेताना रंगेहाथ सापडला


अचलपूर :- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी चालू असल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगलेच हात ओले होत आहेत तीन दिवसापूर्वी चांदूरबाजार नाक्यावर सकाळीच एक रेतीचा ट्रक पकडला होता त्या रेतीच्या ट्रकची सेटलमेंट करताना नायब तहसीलदार शंकरराव यांनी 18000 रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले असून यापूर्वीही अशा प्रकारच्या भरपूर कारवाया अचलपूर तालुक्यात झाल्या होत्या परंतु यात कोणताही रेती तस्कराच्या माध्यमातून तक्रारी प्राप्त न झाल्यामुळे सदर प्रकरणे राजरोजपणे चालू होते विशेष म्हणजे या तक्रारदाराने अमरावती विभागाच्या लाच लुचपत विभागात तक्रार केली होती त्यानुसार दि .17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तहसील परिसरात 18 हजार रुपये लाच घेतांना नायब तहसीलदार यांना रंगेहात पकडले .
उपविभागीय कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी करून देतो सेटलमेंट – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अचलपूर उपविभागीय कार्यलयात कंत्राटी तत्वावर काम करणारा एक व्यक्ती वाळू माफिया आणि अधिकारी यांच्यात सेटलमेंट घडवून आणत असतो.या प्रकरणात त्याची भूमिका देखील महत्वाची असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे या व्यक्तीवर कारवाई कधी होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post