महात्मा गांधी महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना



आरमोरी, दि. ०८/१०/२०२२

          स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागाद्वारे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर व आयोजक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गजानन बोरकर उपस्थित होते.

            याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी राज्यशास्त्र हा विषय समाजविज्ञान शाखेतील राजकीय व्यवस्थेचा अध्ययन करणारा अत्यंत महत्वाचा विषय असून स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यशास्त्र विषयाचे विशेष महत्व आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. गजानन बोरकर यांनी वर्षभरात घ्यावयाच्या विविध उपक्रमांमध्ये मानवाधिकार दिन, लोकांचे जैवविविधता नोंदवही, विविध राजकीय संस्थांना भेटी, राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती, शैक्षणिक सहल याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच सत्र २०२२-२३ मधील कार्यकारिणी घोषीत करताना अध्यक्ष म्हणून अश्विनी ठाकरे बी. ए. भाग तृतीय, उपाध्यक्षपदी समीक्षा बावणे बी.ए. भाग तृतीय तर सचिवपदी डिंपल कुंभलवार बी.ए. भाग द्वितीय तर सदस्य म्हणून अनंतराज नखाते, वैशाली सहारे, हर्षणा निकुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

            कार्यक्रमाचे संचालन कु. बारसागडे हिने केले तर आभार कु. हर्षा वालदे हिने मानले. कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभागातील पदवी शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post