आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक इंद्रधनुष्य २०२२ स्पर्धेत महात्मा गांधी महाविद्यालयाचे सुयश


आरमोरी, दि. १८/१०/२०२२
 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे दि. ११ ते १३ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले होते. या सांस्कृतिक संमेलनात शास्त्रीय ताल वाद्य संगीत या कला प्रकारात स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथील अजित कुकडकार बी. ए. भाग १ च्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. 
 या यशाबद्दल मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा मा. सुनिताताई वनमाळी, सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी, उपाध्यक्ष मा. नुरअल्लीभाई पंजवानी, संस्थेचे समस्त पदाधिकारी, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शशिकांत गेडाम, डॉ. गजेंद्र कढव, संगीत विभागप्रमुख प्रा. मीना उपाध्ये, प्रा. प्रेरणा लोणारे, समस्त प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post