स्व. किशोरभाऊ वनमाळी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सेवादिनाचे आयोजन महात्मा गांधी महाविद्यालयात रोगनिदान व रक्तदान शिबिर संपन्न



आरमोरी, दि. १८ ऑक्टोबर २०२२ 
     मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. किशोरभाऊ वनमाळी यांचा स्मृतीदिन सेवा दिन म्हणून महाविद्यालयात पाळला जातो. या स्मृतीप्रीत्यर्थ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, सूक्ष्मजीवशास्त्र आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. मनोजभाऊ वनमाळी, संस्थेचे पदाधिकारी मा. दिपकजी बेहरे, मा. उमाकांत वनमाळी, मा. हरिश्चंद्र बोंदरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, रासेयो प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के, डॉ. सीमा नागदेवे, प्रा. कविता खोब्रागडे, प्रा. शशिकांत गेडाम उपस्थित होते. 
     याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी यांनी शिबिराला शुभेच्छा देताना संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम सातत्याने सुरू राहावा. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानाची सेवा पवित्र कार्य आहे. महाविद्यालयाकडून सेवादीनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो, आभार मानतो असे प्रतिपादन केले. 
     यावेळी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी स्मृतीदिन हा यापूर्वीच झाला. परंतु सततच्या पावसाच्या व्यत्ययामुळे रहदारी बंद होती, वैद्यकीत अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाही म्हणून सेवादिनाचे आयोजन करण्यास विलंब झाला. आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने या शिबिरात रक्तदानाची नोंदणी केली. याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. रक्तदान हे पुण्यकार्य आहे. यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. हे राष्ट्रीय सेवा कार्य करण्यास आरमोरी आणि गडचिरोली येथील वैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांनी डॉ. अंजली साखरे आणि त्यांची चमू गौरी साळवे, किरण दहिकर, आशीष वासनिक, मयूर ठाकरे, राजेंद्र चौधरी यांचे आभार व्यक्त केले. डॉ. अंजली साखरे यांनी शिबिराला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
याप्रसंगी रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिरात सहभागी प्रतिनिधींचे व नोंदणी करणाऱ्या सदस्यांचे एचबी, ब्लड ग्रुप, सीबीसी, थायराईड, एलएफटी, केएफटीची चाचणी करण्यात आली. तसेच रक्तदान व रोगनिदान करण्यात आले. याप्रसंगी ६३ प्रतिनिधींनी रक्तदानासाठी नावनोंदणी केली तर ३० प्रतिनिधींनी रक्तदान केले. त्यात मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचा रक्तदान करण्यात विशेष सहभाग होता. यशस्वीतेसाठी महात्मा गांधी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post