पाच हजार रुपये दर महिन्याला द्या, कामावर न येता पूर्ण पगार घ्या ...

नाशिक :- महानगर पालिकेच्या (NMC) दोन कर्मचाऱ्यांनी पैसे कमविण्याचा नवा फंडा आखला होता. पण, त्या आधीच ते दोघेही लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या (ACB) सापळ्यात अडकले आहे. पाच हजार रुपये दर महिन्याला द्या, कामावर न येता पूर्ण पगार घ्या अशी योजनाच नाशिक महानगर पालिकेच्या दोन पालिका कर्मचाऱ्यांनी आखली होती. नाशिकच्या (Nashik) नाशिकरोड विभागीय कार्यालयातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच हजार रुपयाची मागणी पालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याकडे करण्यात आली होती. त्याने ही तक्रार थेट एसीबीकडे केली होती. याची दखल एसीबीने घेत सापळा रचला होता. त्यात एसीबीच्या पथकाला यश आले असून स्वछता निरीक्षक राजू निरभवणे आणि मनपा कर्मचारी बाळू जाधव असे लाचखोर संशयितांची नावे आहेत.

स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक असे नाशिक महानगर पालिकेचे ब्रीद वाक्य आहे. त्यासाठी हजारो सफाई कर्मचारी काम करतात.

सफाई कर्मचारी हे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात, पण त्याच सफाई कर्मचाऱ्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

रामदास आठवले राजकारणातील जोकर आहे - आनंदराज आंबेडकर
👇👇👇👇


दोन सफाई कर्मचाऱ्यांनी एक भलताच पराक्रम केल्याचे समोर आले असून त्यांना नाशिकच्या एसीबीच्या पथकाने अटक केली आहे,

पाच हजार रुपये दर महिन्याला द्या, कामावर न येता पूर्ण पगार घ्या अशी योजनाच आखल्याचे समोर आले असून पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खरंतर ही बाब पालिकेत नवीन नसून असा कारभार विविध विभागात सुरू असल्याची चर्चा आत्तापर्यंत दबक्या आवाजात सुरू होती, मात्र लाचखोरीच्या कारवाईने चव्हाट्यावर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post