तरुणांनो... ऑनलाईन सेक्सला बळी पडू नका...

चंद्रपूर:- ऑनलाईन सेक्स ला बळी पडून अनेक तरुणांचे संसार उद्धवस्त झाले आहे. तर हजारोंच्या करोडो रुपयांना चुना लागला आहे. सुरुवातीला हे आपल्या फेसबुक इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या प्रोफाइल च्या माध्यमातून आपली संपूर्ण माहिती घेतात या नंतर आपल्याला फेसबुक वरून सुंदर मुलीचा फोटो डि. पी. लावलेल्या मुलीच्या आयडी वरून फ्रेंड रीकवेस्ट येते ती आपण एक्सेपट केल्यास मेसेंजर मध्ये Hi, Hello असे करून बोलण्याची सुरवात करण्यास भाग पाडले जाते. आपण रिप्लाय दिला की आपणाला विविध नावाच्या माध्यमातून फसवण्यासाठी वेगवेगळ्या नावातून बोलण्याचा प्रयत्न केला जातो जानु, बेबी, शोना असे नाव घेऊन विश्वासात घेऊन व्हाट्सअप नंबर मागितला जातो व नंतर व्हिडिओ कॉल करुन व्हिडिओ कॉल वर मौज मस्ती करु, अश्लील व्हिडिओ, फ्लाईंग किस, सेक्स करू असे बोलुन व्हिडिओ कॉल केला जातो व्हिडिओ काल आपण रिसिव्ह केल्यास आपल्याला एका सुंदर मुलीचा व्हिडिओ दाखवला जातो, ती देखील आपल्याला लाईक करण्यासाठी प्रवृत्त होते आणि यानंतर चालू होतो पुढील धमाका जो यामध्ये माणूस फसला जातो आणि त्यातून त्याला अशी किंमत मोजावी लागते की त्यामधून त्याची सुटका होणे खूप अवघड आहे म्हणून अशा पद्धतीने तो देखील या मागणीला हो म्हणून जशी जशी मागणी येईल तशी तशी देण्याचा प्रयत्न व प्रेमाच्या जाळ्यात घेण्याचा प्रयत्न देखील केला जातो. हा प्रकार जो सेक्स च्या स्वरूपात असतो. यालाच ऑनलाईन सेक्स असे ही म्हणतात. या नंतर त्या तरूणाला त्याचा फोटो व चेहरा स्क्रीनवर आला की त्याचे स्क्रीन व्हिडिओ बनवून चेहऱ्याची व्हिडिओ एडिटिंग द्वारे नग्न अवस्थेत व्हिडिओ तयार केला जातो. तो व्हिडिओ परत पाठवून ब्लॅकमेलिंग सुरू केली जाते. सोशल मीडियावर वायरल करून बदनामी करण्याची धमकी देत पैश्याची मागणी केली जात आहे. जो व्यक्ती त्यांना पैसे पाठवणार नाही त्यांची बदनामी करण्यासाठी त्याच्या मित्रांमध्ये हे व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली जाते जेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा उकळता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो. केंव्हा केंव्हा तर आपले बँक अकाउंट हॅक करुन खात्यातील पैसे रिकामे केले जातात. या संपूर्ण प्रकरणानंतर जे बळी पडलेला तरुण शेवटी आत्महत्या करतो आहे त्याचा संसार देखील उध्वस्त होऊन बसतो अशा घटनांची खूप गतीने वाढ होत आहे. तर कृपया अशा प्रकाराच्या फसवणुकीला बळी न पडता सावध व सतर्क रहावा त्यासाठी काय करावे सुंदर मुलीचे फोटो बघून फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नये.

- आपला व्हाट्सअप नंबर आनोळखी तरूणींना देऊ नये.

- व्हिडिओ कॉल रिसीव करू नये.

- जरी रिसीव केल्यास आपला चेहरा स्क्रीनवर दिसू नये असे काही करावे.

- आपल्याला धमकी मिळाल्यास पैशाची मागणी केल्यास त्याला तात्काळ ब्लॉक करावा किंवा पोलीस, क्राईम ब्रँच, पोलिस स्टेशनला कळवावे.

• फेसबुक वर आपली प्रोफाइल प्रायव्हेट करून लॉक करावी. - अशा रीतीने ऑनलाईन हनी ट्रैप मधून सुटका करून आपण आपले जीवन सुखी समृद्धी व टेन्शन फ्री करू शकतो. नाहीतर यामध्ये फसला तर वरच्या माहिती प्रमाणे गत झाल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post