राहुल गांधींची प्रतिमा खराब करण्यासाठी BJPने कोट्यवधी रुपये खर्च केले"

हिंगोली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण लोकांनी त्यांची खरी प्रतिमा काय आहे हे सांगण्यासाठी आम्हाला केवळ रस्त्यावर उतरावे लागले, असे विधान भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात दाखल झालेल्या कन्हैया कुमार यांनी केले आहे. (Bharat Jodo news in Marathi)



'राहुल गांधींबद्दल लोक नको ते बोलले. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची खरी प्रतिमा पाहायला मिळेल, असंही कन्हैय्या यांनी म्हटलं.सोशल मीडियावर राहुल यांची प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आता, त्याच्या विपरीत प्रतिमा सर्वांना दिसत असल्याचं कन्हैय्या यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या सर्व प्रवाशांचेही अभिनंदन केले. कन्हैया म्हणाले की, जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की लोक येतील का? तेवढं चालता येईल का? पण या प्रवासाचे ६० दिवस कसे निघून गेले हे कळलेच नाही.

दरम्यान देशाला अशा यात्रेची गरज होती. यात्रेले जेवढं कव्हरेज मिळायला हवं होतं, तेवढं टीव्ही माध्यमांवर दाखवलं गेलं नाही. मात्र प्रचार केला नाही तरी, भारत जोडो यात्रा सुरू आहे हे, देशातील जनतेला माहीत असल्याचंही कन्हैय्या यांनी नमूद केलं.

Post a Comment

Previous Post Next Post