माणूस देवा धर्माच्या नांदी कधी लागतो?.



माणूस वडिलोपार्जित रीतिरिवाज,परंपरा या श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या मोहजालात कायमस्वरूपी गुंतलेला असतो,तो कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर किंवा पी एच डी केलेला गोल्ड मेडेलीस असला तरी रीतिरिवाज परंपरा तोडण्याची हिंमत करीत नाही.यातुनच अंधश्रद्धांचा उगम होतो. माणसाच्या मनात भीती कधी ही निर्माण होऊ शकते,घरांतून बाहेर निघाला आणि समोरून मांजर आडवी गेली तर ?.रीतिरिवाजांच्या श्रद्धा,अंधश्रद्धा सर्व गोष्टी च्या आठवणी जाग्या होतात.त्या नाकारून माणूस पुढे गेला तर अचानक एखादी घटना घडली तर त्याला परिस्थिती लक्षात घेऊन विचार केला जात नाही.भीती ही मनात जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला वाटत असते की काहीतरी धोका आहे.पण हा धोका नेमका कशाचा आहे.कोणता आहे.हे जर समजले नाही तर मात्र आपण या धोक्यापासून मुक्तता मिळावी म्हणून काहीही करतो!.उपवास करतो,भटा ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या देवाला साकड घालतो,त्यांनी सांगितलेले वेगवेगळी कर्मकांडं करतो. त्यातूनच तयार होते.श्रद्धा आणि अंधश्रद्धा.मगच माणूस देवा धर्माच्या नांदी कधी लागतो.
   भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) ही भारताची प्रमुख अणु संशोधन संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे,मुंबई,महाराष्ट्र येथे आहे. बीएआरसी हे बहु-शिस्तीचे संशोधन केंद्र आहे ज्यामध्ये अणू विज्ञान,अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्राच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा समावेश असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा उपलब्ध आहे.बी ए आर सी कर्मचारी अधिकारी वर्गाची मोठी निसर्गरम्य वसाहत आहे.वसाहत मध्ये नेमके असंच भीती निर्माण करणारे काहीतरी माझ्या मित्राबाबतीत घडले. त्याने कपडे धुतल्यावर वाळत घातलेले असतात,ते वाळल्यानंतर त्याने कपाटात आणून ठेवले होते. जेव्हा तो त्यातला एक कपडा काढायला गेलो तेव्हा "चुई चुई चर्रचर्र" असा आवाज झाला.क्षणभर त्याला वाटले उंदीर असावा. पण त्याच्या घरात एकही उंदीर कधी आजवर नव्हता.हा विचार त्याने मनातून काढून टाकल्यावर दुसरा विचार सुरू झाला. मग काय असावे?तिथे त्याने एकेक कपडा काढून ठेवला.आणि समोर जे दिसलं त्यांने त्याच्या मनात चर्र झाले.जे दिसत होतं ते वेगळंच कधीही न पाहिलेले आणि काहीतरी अतर्क्य,भीतीदायक होते.त्याने तो कपडा लगेचच जमिनीवर भिरकावून दिला.
          एक मोठं फुलपाखरापेक्षाही दांडगं असलेले वेगळंच समोर दिसले.डोक्यावर कवटी सारखे रूप.ही छोटी कवटी इथे कशी काय आली असा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला? हे समजलं की हे फुलपाखरू सारखं काहीतरी दिसतंय.पण असं कवटी डोक्यावर असलेलं फुलपाखरू मी आजवर पाहिलेलं नव्हते.जेव्हा असं वाटलं की हे फुलपाखरू आहे, तेव्हा मनातील भीती कमी झाली. मात्र मनात शंका आली की हे विषारी तर काही नसेल ना? आणि मग थोडा वेळ त्याकडे बघत राहिल्यानंतर लक्षात आले की ते कपड्याला चिकटून बसलेले आहे. हालत नाही. मग त्याने त्याचा फोटो काढला आणि मग ठरवलं याची चिकित्सा करूया. जेव्हा गुगलवर सर्च केलं तेव्हा पटकन त्याला कळले की या पट्ट्याचे नाव आहे "डेथस् हेड हॉकमाॅथ" असे आहे.माॅथ म्हणजेच मराठीत बोलायचं झालं तर मृत्यूच्या डोक्याचं एक अवाढव्य पाखरू! 
     खरं तर आम्ही बारावीला असताना बॉटनी आणि झूलॉजी हा विषय आम्हाला खूपच आवडायचा आणि त्यामुळे त्याचा खूप मोठा अभ्यास केला होता. त्यामुळे आम्हाला लक्षात आले की याचा किंगडम-फायलम-क्लास-ऑर्डर-फॅमिली-जीनस अशा क्रमाने वंशावळीचा सोक्षमोक्ष लागेल.आणि तो आम्हाला सापडला.या पाखराचं बारसं आम्हाला लगेच सापडले.या पाखराचं नाव होते "आचीरोन्शिया लॅकेसेस". हे पाखरू चक्क मधावर जगतं. जिथे जिथे मधमाशांची पोळी आहेत त्या त्या ठिकाणी हे पाखरू घिरट्या घालत असतं. जेव्हा ते मधाच्या पोळ्या जवळ जातं तेव्हा ते विशिष्ट प्रकारचा एक सुगंध सोडतं. आणि तो सुगंध मधमाशांना चकवतो. कारण मधमाशांना असं वाटतं हे पाखरू आपल्यातलच आहे! त्यामुळे ते या पाखरावर हल्ला करत नाहीत. आणि मग हे पाखरू मधमाशांच्या पोळ्यात घुसतं आणि मस्तपैकी मध पीत राहते.असं हे अवलिया असलेलं पाखरू आमच्या समोर होते. मोबाईल मध्ये पटापट जेव्हा आम्ही ही माहिती मिळवत गेलो. तशी आमची भीती कमी कमी होत गेली.जेव्हा अज्ञान असते.तेव्हा भीती टोकदार बनते आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होते. तेव्हा भीती नाहीशी होते.रीतिरिवाज,परंपरा या श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या मोहजालातुन माणूस कायमस्वरूपी बाहेर पडतो.
          अंधश्रद्धा या अज्ञानातून निर्माण होतात आणि जेव्हा आपण ज्ञान मिळवतो तेव्हा अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांची चिकित्सा आपण जोमाने करू शकतो.त्याला आम्ही हात लावला तेव्हा ते उंदरासारखं चिर्र आवाज करत होते. हा आवाज निश्चितच नवीन माणसाला काळजात चर्र करणारा असा वाटतो. यामुळे आफ्रिकेत देखील या पाखराच्या विषयी अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत आणि त्या कवटीच्या डोक्याने काहीतरी गुढ,आणि अतिंद्रिय अशा समजुती तयार करून मोकळ्या झालेल्या आहेत.या मृत्यूच्या डोक्याच्या पाखराला घेऊन 'द ब्लड बिस्ट टेरर' नावाचा सिनेमा देखील आला होता. अनेक सिनेमात याचा वापर करण्यात आलेला आहे.हे सारं समजल्यावर मात्र आम्ही या पाखराला अलगदपणे उचलले आणि बाहेर कुंडीत लावलेल्या झाडावर नेऊन तिथे चिकटवले. तेही तिथे आरामात बसले. 
आम्हाला याचा खूपच आनंद झाला की ते आता निवांत तिथे बसेल आणि भूक लागेल तेव्हा माझ्या घराच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकी वर अनेक मधाची पोळी जी चिकटलेली आहेत तिकडे झेपावेल.
         खरंच..विज्ञानाने कितीतरी अंधश्रद्धांचा समूळ नायनाट केलेला आहे. हे आम्हाला पुन्हा एकदा प्रत्ययाला आला.विज्ञान हे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फोलपणा थेट पणे दाखवून देत आहे व असते.आणि म्हणूनच जे कोणी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ना कवटाळून राहत आहेत ते घाबरलेल्या अवस्थेत जगत आहेत.कुठल्यातरी अज्ञात शक्ती वर विश्वास ठेवून किंवा त्या शक्तीला घाबरून कर्मकांडं करतात. प्रार्थना करत जगत आहेत.मृत्यूच्या डोक्याच्या पाखराने या साऱ्यांची पुन्हा एकदा आमच्या मनात उजळणी केली. ज्ञानाचं हत्यार हे भीती,राग,दुःख आणि द्वेष या भावनांना नाहीसे करते हे मात्र शंभर टक्के खरे आहे.ज्ञान आणि विज्ञान माहिती असलेला माणूस देवा धर्माच्या नांदी कधी लागत नसतो.
संकलन :- सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

Post a Comment

Previous Post Next Post