प्रज्ञा आणि प्रेरणा !

प्रज्ञा आणि प्रेरणा !



शिवराम पाटील
तुमचे विचार म्हणजे झणझणीत अंजन आहे,
पुर्वी निवडून येण्यासाठी काही सज्जन लोकांनी पैशाचे प्रलोभन देवुन निवडून गेले, मग तो पैसा काढण्यासाठी भ्रष्टाचार, आणि मग हे अव्याहत चक्र। 
हे सर्वांनाच वाटते की हे थांबायला हवं पण कसं? 
नगरसेवक म्हणून निवडणुकीत सर्वच उमेदवार मनात हाच विचार करतात की पैसे दिल्यावर मी पण निवडून येईल, आणि मग सर्वच जण पैसा घेवुन मतदारांच्या घरी जातात, 
आता या जबरदस्त प्रलोभन पुढे मतदार आपली नैतिकता विसरतो आणि निर्लज्जपणे सगळ्यांचेच पैसे घेवुन, मत मात्र एकालाच देतो, वेळ आली तर उभ्या उमेदवारा पैकी एखादा त्याचा दाराशी पैसा घेवुन गेला नसेल तर तो त्याची वाट पाहत बसतो, पैसे देणारे उमेदवार 'मत द्यायला चल भाऊ!' म्हणतो तरी तो त्याला तोंडावर सांगतो, 'थांबरे भो, त्यान्हा पैसा येवाना बाकी शेतस!'
आणि मग शेवटी संध्याकाळी मतदान संपायची पाळी येते तेंव्हा मतदान केंद्रावर गर्दी ऊसळते, मग सकाळ पासून बसलेले कर्मचारी यांना आदेश येतो की जेवढे मतदान करायला आले आहे त्यांची मते टाकुन घ्या। 

आता विचार करा दिवसभर मतदान केंद्रावर शुकशुकाट असतो आणि मग ही जी गर्दी अचानक येते ती प्रशासनाने लक्षात घेऊन वेळेवरच मतदान केंद्र बंद करून पहीला घाव घातला पाहीजे
2- सर्वच्या सर्व च पैसा देतात, तर देणारे लोकांनी विचार करावा की मी पैसा वाया का घालवावा, आणि पैसा देणं थांबवावे, 
3-ईतर सर्व जण मिळुन हा प्रकार आपण करणार नाही याची शपथ घ्यावी 
4-वरील संघटीत उमेदवार यांनी वाच ठेवून जो कोणी पैसा वाटेल त्याला प्रतिबंध करीत जावे, 
हारले तरी खंत बाळगु नये। मानहानी झाली असही समजु नये, हे एक समाज उत्थानाचे कार्य आहे, जर आपल गांव व देश घडवायचे असेल तर हे सर्व मिळुन अवश्य करावे, ह्याच लोकांनी पुढे निवडुन जाणाऱ्या ने पैसे खावु नये वा भ्रष्टाचार करु नये म्हणून जागरुक राहुन त्यांचावर वाच ठेवून असावे, 
किर्तन, भजन, नामस्मरण, यातुन नैतिकता शिकवली जाते पण तो प्रकार या कलीयुगात आता नामशेष होत चालले आहे, 
या साठी फक्त नी फक्त 
सद् सद् विवेक बुद्धि जागृत ठेवणे व देश व समाज कल्याण या साठी मी स्वातंत्र्य युद्धात सहभागी होवु शकलो नाही, सावरकर,भगतसिंग, राजगुरु,टिळक आगरकर अनेक लोकांनी घरावर तुळशी पत्र ठेवले मी एवढे करु शकणार नाही, पण- आता माझा देश चांगला घडवण्यासाठी मला योगदान देणे आहे. लोकांनी निवडुन दिले तर मी ते जरुर करेन.
मी माझ्या अति स्वल्प बुद्धि प्रमाणे माझे मत मांडले, 
कुणाला आणखी काही अलग विचार प्रबोधन मांडायचे असतील, 
पण आता या दिशेने पावले उचलली गेली पाहिजे, देश प्रेमाने सर्वांची मने भारली गेली पाहिजे, जापान सारखी प्रगती झाली पाहिजे, 

......लक्ष्मीकांत भावसार.

         श्रीमान लक्ष्मीकांत भावसार,
   आम्ही हाती घेतलेल्या जनजागृतीच्या कामात काही उणिवा असतील तर निदर्शनास आणून द्या.जेणेकरून काम अधिकतम निर्दोष होईल.जर शक्य झाले तर या जनजागृती मोहिमेत सहभागी व्हा.
      प्रत्येक काळात राम असतो, कृष्ण असतो,बुद्ध असतो, गांधी असतो.आम्ही ओळखत नाहीत.रामाला जटायु,शबरी,सुग्रीव , हनुमान,वानर,मंदोदरी,बिभीषण ,वाल्मिक ऋषी यांनी ओळखले.इतरांनी नाही ओळखले.तसे ओळखले असते तर राम वनवासात गेले नसते.सीता हरण झाले नसते.सीता त्याग सुद्धा झाला नसता.पण दुष्ट माणसे तसे वाईट काम करीत असतात.सृष्ट माणसे रामाला मदत करीत असतात.कदाचित मी किंवा तुम्ही रामाच्या काळात जन्माला आलो होतो.पण आपल्या वैयक्तिक, प्रापंचिक स्वार्थांध होतो.म्हणून रामाला ओळखले नसावे.राम आपल्या शेजारी, आपल्याला खेटून किंवा बोलून गेला ही असेल पण आपण दुर्लक्ष केले असेल.असे तर रोज भेटतात, म्हणून.आणि आता जेंव्हा रामाचे चरित्र. वाल्मिक ऋषींनी लोकांसमोर मांडले तेंव्हा राम भजू लागलो.हे राम!मला एकदा दर्शन दे ! तेंव्हा राम म्हणतो,मी तर आलो होतो,तुझ्याकडे.पण तू मला ओळखले नाही.तू तुझ्या अन्न वस्त्र निवारा धनसंकलनाच्या तंद्रीत होता.तू नाही प्रतिसाद दिला म्हणून मी पुढे निघून गेलो.
    अशीच स्थिती आहे.अशीच परिस्थिती आहे. आज ही आहे.आम्ही सृष्ट कामात सहभागी होत नाही.आम्हाला कळते पण वळत नाही.आम्ही आमच्या वेगळ्या नादात असतो.जेवण झाले तर ताट घरी कसे नेता येईल,वाटी ,चमचा, ग्लास कसा लपवता येईल या सकमोरीत असतो.त्यामुळे आम्हाला भोजनातील मिष्टान्नाची गोडी ही कळत नाही.मान सन्मान सुद्धा लक्षात येत नाही.हे दिसण्यासाठी, कळण्यासाठी सृष्ट चक्षू लागतात.जसे ब्रह्माचे स्वरूप कळण्यासाठी दिव्य चक्षू लागते,असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. 
     माझा विश्वास आहे,युग कोणताही असो , ईश्वर सज्जन आणि दुर्जन यांचा समतोल ठेवत असतो.प्रत्येक युगात ,काळात ,वर्षात,दिवसांत हा समतोल विश्वात टिकून असतो.याला पदार्थ विज्ञान मधे law of conservation म्हणतात.पृथ्वीवरील धातुघटक,वायु घटकांचे प्रमाण सुद्धा कायम असते.प्राणवायु २१टक्के असतो.तो ५०टक्के किंवा १०टक्के होत नाही.झालेच तर त्याचे स्थलनिहाय घनीकरण किंवा विरलीकरण होत असते.तसेच लोखंड आणि सोन्याचे प्रमाण पृथ्वीवर समतोल टिकून असते.समतोल म्हणजे सारखे नव्हे प्रमाण टिकून असते.अन्यथा पृथ्वीवर सोने वाढवता आले असते.किंवा लोखंड वाढवता आले असते.तसाच सत असत चा समतोल विश्वात,निसर्गात,समाजात टिकून असतो.रावण आहे तेथे राम ही आहेच.कंस आहे तेथे कृष्ण आहेच.
  आता जे घडले,तो काळाचा परिणाम आहे.त्या त्या काळात चुकीच्या घडलेल्या घटना,कृती.पण त्याचबरोबर योग्य घटना सुद्धा घडत असतात.आम्ही जे करतो ती सुद्धा तशीच काळाची गरज असते.आम्ही फक्त ते करणारे पुर्जा असतो.पार्ट असतो.ही प्रज्ञा तुम्हाला सुद्धा आली आहे.अनेकांना आली आहे.ती उद्दीपीत होत करणे आवश्यक आहे.प्रेरणा देणे आवश्यक आहे.तेल आणि प्राणवायू आहेच फक्त तो उद्दीपीत करून ज्योत पेटवणे आवश्यक आहे.ही ज्योत माणूस पेटवतो, आपण पेटवतो.ते पेटण्याची प्रज्ञा आहे, आम्ही प्रेरणा देत असतो. माणूस जिवंत आहे फक्त जागृत करीत असतो.

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post