वनश्री महाविद्यालयात संविधान दिवस साजरा


----------------------------------------
कोरची, दिनांक २६/११/२०२२
  स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. डॉ. विनोद चहारे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. आर. एस. रोटके, प्रा. सी. एस. मांडवे, प्रा. एस. एस. दोनाडकर, प्रा. पी. के. चापले, डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे, प्रा. फुंडे व मनीष लाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांना संविधानाची उपयुक्तता व महत्व पटवून देण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. फुंडे यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार कु. शहारे हिने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी मोलाचे सहकार्य केले. 
----------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post