कोजबी येथे मानवधर्माची चर्चा बैठक संपन्न... अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाबळी ,स्त्रीभ्रूण हत्या आदी विषयावर झाले मार्गदर्शन...

कोजबी येथे मानवधर्माची चर्चा बैठक संपन्न...


अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाबळी ,स्त्रीभ्रूण हत्या आदी विषयावर झाले मार्गदर्शन...

दिनेश बनकर
जिल्हा प्रतिनिधी 
सुपरफास्ट बातमी




आरमोरी :- आरमोरी तालुका स्थळापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली यांच्या वतीने कोजबी येथे दिनांक 6 /11 /2022 रोज रविवारला नववे मासिक हवन कार्य निमित्याने मानवधर्माची चर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती.


 या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोविंदरावजी दोनाळकर अध्यक्ष आयोजन नियोजन समिती गडचिरोली , तर प्रमुख अतिथी म्हणून फाल्गुन जी मानकर मार्गदर्शक कुरखेडा, विठ्ठल राऊत मार्गदर्शक आरमोरी, गुणवंत फट्टे मार्गदर्शक तळोधी, दिवाकरजी ठेंगरी अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक संस्था गडचिरोली, माणिकजी मानकर मार्गदर्शक कोजबी, हिम्मतलाल किरमे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक संस्था लांजी, (मध्य प्रदेश) रविंद्रजी कांबळे मार्गदर्शक चुरमुरा, सौ.वैशाली डोंगरवार सरपंच , प्रशांत ठेंगरे सर, रामदास डोंगरवार पत्रकार , दिनेश बनकर पत्रकार, राजेश्वर दूमाने ग्रामपंचायत सदस्य , तात्याजी गेडाम ग्रामपंचायत सदस्य, सुषमा बोदेले ग्रामपंचायत सदस्य, दुमन मोहिते ग्रामपंचायत सदस्य कोसबी , श्री मानकर जी , सौ.माधुरी सहारे पोलीस पाटील कोसबी , आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 चर्चा बैठक ही मान्यवरांनी मानव धर्मावर आधारित मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनी दिलेले चार तत्व, तीन शब्द, पाच नियम, आणि व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या आदी विषयावर सेवक सेविकांना मार्गदर्शन केले.
या चर्चा बैठकीला गडचिरोली, आरमोरी ,ब्रह्मपुरी, नागभीड, वडसा, अहेरी, धानोरा, सिरोंचा आदी परिसरातील सेवक, सेविकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


या चर्चा बैठकीचे प्रास्ताविक प्रशांत ठेंगरी सर यांनी केले.
 तर चर्चा बैठकीचे संचालन माणिक जी मेश्राम यांनी केले .
तर आभार लांजेवार जी यांनी मानले.
 या चर्चा बैठकीचा समारोप मानवधर्माच्या सायंकाळच्या प्रार्थनेने करण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post