अभ्यासाची दिशा बदला तुमच आयुष्य बदलेल उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे प्रतिपादन

 🟩 पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रम 


जोगीसाखरा- खऱ्या अर्थाने अभ्यास कसे करायचे हे युवकांनी व विद्यार्थ्यांनी पुस्तकाच्या बाहेर निघून शिका नोकरी लागण्यासाठी शिक्षण ही पात्रता नाही त्याच्या पलीकडे जाऊन मला काय पाहिजे ते शोधा जेवढी मेहनत ग्राउंडवर घेतो तेवढीच मेहनत लेखी परीक्षेत घेतल्यानंतर आपल्यामध्ये सुधारणा होते आणि यशाच्या जवळ जातो हे आपल्याला दिसतं म्हणून आपण मेहनत करतो ज्यावेळेस आपण अभ्यास कराल तेव्हाच फायदा होईल आपण भरतीची तयारी करीत आहोत तर तब्येतीची काळजी घेणे घेतले पाहिजे सगळ्या गोष्टीचे नियोजन केलं पाहिजे तरच यशस्वी होऊ शकतो यादी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेच्या उपलब्धता नव्हती परंतु आत्ता येथील होतकरू युवकांनी ग्रामीण भागात संधी  उपलब्ध करून दिली तिचा फायदा होतकरू मुलांनी घेतला पाहिजे पोलीस भरतीतील  स्पर्धा आणि परीक्षा या वयात चांगल्या गोष्टीवर लक्ष दिल्यास तर समोर फार मोठा फायदा होईल म्हणून युवकांनी अभ्यासाची दिशा बदला तरच तुमच आयुष्य बदलेल असे प्रतिपादन गडचिरोली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील समाज मंदिरात पोलिस स्टेशन आरमोरी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा ग्रामपंचायत व राजपथ अकॅडमी आरमोरी च्या वतीने पोलिस भरती पुर्व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली त्या वेळी उद्घाटनिय स्थानावरून बोलत होते 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरमोरीचे तहशिलदार कल्याणकुमार दहाट 
विशेष अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक मनोज काळबाधे सरपंच संदिप ठाकुर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम राजपथ जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकृष्ण खरकाटे स्वरवती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमत बोरकर अकॅडमीचे संचालक शशीकांत मडावी यशस्वी कोचिंग क्लासेस चे संचालक सुखदेव पवार प्रा. गोपाल दोनाडकर प्रा.कैलास खरकाटे जकास संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सचिव गिरीधर नेवारे तमृक्त समिती अध्यक्ष हरीदास बावणे भिमराव मेत्राम पोलिस पाटील राधाताई सडमाके संचालक यादोराव कहालकर सुरेश मेश्राम दामोदर मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी सांगितले कि प्रयत्न केले तर जिवनात काहीच कठिण नाही फक्त लक्ष केंद्रित केले तर यश हमखास येऊ शकते असेही बोलले याप्रसंगी तहशिलदार कल्याणकुमार दहाट यांनी म्हटले की. शिक्षक तुम्हाला वारंवार सांगत असतात या वयात स्वतःला सांभाळायचे असते पण हे वय अशा कामात घालून नका हे वय चांगल्या कामात घालवा अभ्यास करा हे जे तुम्ही विचार करताच हे करण्यासाठी पुढे भरपूर आयुष्य बाकी आहे आता आपलं लक्ष अभ्यासावर व करियर घडवण्यावर असले पाहिजे असे बोलले यांसह पोलिस निरीक्षक मनोज काळबाधे राजपथ अकॅडमीचे संचालक  शशीकांत मडावी यशस्वी कोचिंग क्लासेस चे संचालक सुखदेव पवार प्रा.गोपाल दोनाडकर  यांनीही चांगले स्पर्धा परीक्षेवर मागदर्शन केले 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले तर संचालन प्रा.घनश्याम माकडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन. गुणवंत जाभुळे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी दिवाकर राऊत सुनिल कुमरे सुमित बावणे चंद्रशेखर कुमरे यांनी केले 
याप्रसंगी जोगीसाखरा पळसगाव पाथरगोटा शंकरनगर सालमारा सह आरमोरी तालुक्यातील जवळपास तिनशेच्यावर युवक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post