मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे बालपंचायत मेळावा (चर्चासत्र) संपन्न*

(सावली) दिनांक :- 23-12-2022 
मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन, चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक आकाश गेडाम यांच्या नियंत्रणात सावली तालुक्यातील एकूण 34 शाळांमध्ये SCALE "खेळा द्वारे शिक्षण / जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम राबविला जात आहे सदर उपक्रमा अंतर्गत बालपंचायत मेळाव्याचे (चर्चासत्र) आयोजन रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे करण्यात आले. 
चर्चासत्रा करिता एकूण 8 शाळेतील शालेय मंत्रिमंडळ व शिक्षक उपस्थित होते. त्या मध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा खेडी, चांदली बूज, पारडी, कवठी, हिरापूर, चकपिरंजी, शहीद सुरेश पाटील सुरकर विद्यालय कवठी व रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली इत्यादी शाळेतील बालपंचायतीने चर्चासत्रात सहभाग घेतला.

सर्व प्रथम शाळेतील शिक्षक व मुख्यध्यापक व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यशाळा आणि चर्चासत्राला सुरुवात झाली. शालेय मंत्रिमंडळ म्हणजेच बालपंचायातीचे महत्व, जबाबदाऱ्या, कर्तव्य, व त्यांचे अधिकार यावर सर्व मंत्रिमंडळाला मॅजिक बस संस्थेचे तालुका समनव्यक आकाश गेडाम व शाळा सहाय्यक अधिकारी मंगेश रामटेके यांनी मार्गर्शन केले. 

शाळेमध्ये असलेल्या विविध समस्या विद्यार्थ्यांनी कशा ओळखाव्या आणि त्यावर उपाय योजना कशा कराव्या, बालपंचायतीच्या सभेत प्रस्ताव मांडणे, सादर करण्यात आलेल्या प्रस्तावा वर चर्चा करणे, कठीण समस्या व मोठ्या निर्णयांसाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच ग्रामपंचायतीचे सहकार्य कशा पद्धतीने घ्यावे. बालपंचायत सभेचे अहवाल लेखन कसे करावे इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन आकाश गेडाम व मंगेश रामटेके यांनी केले. त्या सोबतच बलपंचायतीची मासिक सभा कशा प्रकारे आयोजित केली जाते याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद उच्च प्राथिक शाळा खेडी येथील शालेय मंत्रिमंडळाने सादर केले. उपस्थित सर्व शालेय मंत्री मंडळातील मंत्र्यांना त्यांच्या पदाची बॅचेस प्रदान करण्यात आली व चर्चासत्राची समाप्ती झाली.

सदर कार्यशाळा व चर्चासत्राला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठी, चकपिरंजी या शाळेचे मुख्याध्यापक मा. नैताम सर, मा. चरडुके सर, रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथील पर्यवेक्षक मा. महादेव लाकडे सर तसेच श्री. अनिल मेश्राम सर, श्री. सुशिल बोरकर सर तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी, कवठी, खेडी, चांदली बूज, हिरापूर येथील श्री. विजय पोलोजवार सर, श्री. प्रकाश वाकडे सर, श्री. उराडे सर, श्री. मसराम सर, श्री. गुरुदास सिडाम सर व शहीद सुरेश पाटील सुरकर विद्यालय कवठी येथील श्री. विनायक हजारे सर उपस्थित होते.

संपुर्ण चर्चासत्र हे तालुका समनव्यक आकाश गेडाम व शाळा सहायक अधिकारी मंगेश रामटेके, श्रद्धा नागमोते, निशा उमरगुंडावार तसेच समुदाय समन्वयक प्रतिक तुंगीडवर, चिराग पोरेड्डीवार, सलोनी कातकर, निशा राऊत, अभिधम्म बोरकर, दिपाली चलीरवार यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरित्या पार पडले.

Post a Comment

Previous Post Next Post