हिन्दु ज्ञान मंदिर, ब्रम्हपुरी येथे 34 वा वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न'



ब्रम्हपुरी:- एकात्मता शिक्षण संस्था संचालित हिंदू ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी दिनांक 04.01.2023 रोजी 34 वा वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटक मा. श्री. बाबासाहेब कहारे, अध्यक्ष एकात्मता शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, प्रमुख पाहुणे मा. सौ. मनिषा केशवराव बावनकर, संचालिका महालक्ष्मी टेक्सटाईल्स इचलकरंजी, मा. श्री. नईम जिवानी, माजी विद्यार्थी व संचालक HUQ ENTERPRISES नागपुर, मा. श्री. केशवराव बावनकर सर माजी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर मा. श्री. नारायण बोकडे सर, मा. श्री. साकेत भानारकर सर, मा. सौ. विद्याताई कात्यायण मॅडम, मा. सौ. डॉ. हेमलताताई नंदुरकर मॅडम, मा. सौ. राधिकाताई जाणी मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम सैय्यद मॅडम, स्नेहसंमेलन प्रभारी सौ. स्नेहा मस्के मॅडम, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व लांजेवार (प्राथ.). केशव भानारकर (माध्य.). विद्यार्थीनी प्रतिनिधी कु तेजु जिभकाटे (प्राथ.), कु.पायल लोखंडे (माध्य.) उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी हस्तकला व विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृती, प्रयोग व रांगोळयांचे परिक्षण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत, स्वागत गीताने व नृत्याने करण्यात आले. सत्र 2019-20 2020-21 व 2021-22 मध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार करून अभिनंदन व शुभेच्छा विदयार्थ्यांना देण्यात आले. मुख्याध्यापिका अंजुम सैय्यद मॅडम यांनी शाळेमध्ये वर्षभर चालणारे कार्यक्रम, विविध उपक्रम याबदल माहिती देत अहवाल वाचनामध्ये शाळेमध्ये घेण्यात येणारे शालेय व शाळाबाहय उपक्रम आणि राबविण्यात येणा-या विविध स्पर्धा, परिक्षा, योजना तसेच भौतिक सोयीसुविधा या विषयी माहिती दिली. शाळेमध्ये भविष्यात करण्यात येणारे विकास उपक्रम याबद्दल माहिती दिली.

प्रमुख पाहुणे सौ. मनिषा बावनकर मॅडम यांनी आपल्या भाषणात शिक्षणांसोबतच व्यावसाईक शिक्षण, उद्योजकता आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये उद्योजकता हा विषय देखील समाविष्ठ करावा असे प्रतिपादन केले. उद्योजकता व कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात या विषयी मा. श्री. बावनकर सर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात मा. श्री. बाबासाहेब कहारे यांनी विद्यार्थ्यांनी अनेक कलागुण जोपासुन स्वताचे व शाळेचे नांव मोठे करण्यासाठी संबोधित करीत अनेक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व पालकवर्ग शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन सौ. हर्षा आबदेव मॅडम, कु. स्नेहलता राऊत मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सौ. स्नेहा मस्के मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post