कुरुड येथे उमेद मार्फत शेतकरी मार्गदर्शन सभा

*कुरुड येथे उमेद मार्फत शेतकरी मार्गदर्शन सभा*


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका देसाईगंज यांच्या वतीने हरभरा पिकाचे व्यवस्थापन व रोग नियंत्रण याबाबत कुरुड येथे मार्गदर्शन सभा घेण्यात आली, सदर सभेला समन्वयक सचिन उपरे, उमेद चे कृषी व्यवस्थापक प्रशांत मंडपे, कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक देशमुख सर, कृषी सहाय्यक वझाडे सर उपस्थित होते, सदर सभेत प्रगतशील शेतकरी शेतकरी खापरे पाटील यांनी सेंद्रिय शेती बद्दलचे आपले अनुभव व्यक्त केले हरभरा पिकावरील घाटे अडी नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काचा वापर शेतकरी महिलांनी करावे असे आव्हान कृषी सखी प्रीती उके यांनी केले, प्रभाग समन्वयक सचिन उपरे यांनी महिलांना शेतीपूरक व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले, निंबोळी अर्काचा प्रात्यक्षिक प्रशांत सर यांनी करून दाखवले, सदस्य शेतकरी सभेचे संचालन बँक सखी चंदा रणदिवे यांनी तर आभार प्रेरिका दीपिका रणदिवे यांनी केले सदर शेतकरी सभेला बहुसंख्य उमेद समूहातील शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरिका सोनम मेश्राम, अर्चना राऊत, उज्वला ठाकरे, बोकडे ताई यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post