साहेब आपला कोणी वाकडा करू शकत नाही चला करु दारू, मटण पार्टी

मौदा:- कार्यालयीन वेळेत मौदा पंचायत समितीच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ओली पार्टी केल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी दिनांक 20 जानेवारीला सभापती स्वप्निल श्रावणकर पंचायत समिती कार्यालयात गेले असता काही प्रमुख अधिकारी आणि अनुउपस्थित असल्याने हा प्रकार उघडकीस आला.
मौद्यापासून एक किमी अंतरावरील वांजरा रोडवरील एका शेतात शुक्रवारी ही पार्टी झाल्याची माहिती आहे .मात्र या पार्टीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका स्वीकारल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
असाच प्रकार मागील काही महिन्या पूर्वी खंडविकास अधिकारी यांनी तालुक्यातील कोदामेढ़ी येथील शासकीय दौरा असतांना दौरा अर्धवट सोडून खंडविकास अधिकारी हे कोदामेढ़ी जवळ असलेल्या एका बार मधे शासकीय गाड़ी घेऊन व गेले होते. त्यांनी शासकीय गाड़ीवर लिहलेल्या महाराष्ट्र शासन यावर ते नाव त्यांनी कागद लाउन चिकटवले होते. व ते बार मधे मिळून आल्याचे उघडकीस झाले. आता पुन्हा प्रकार पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांची शेतातील पार्टी सुद्धा केल्याची उघड झाले.
शुक्रवार मौदा येथील आठवडी बाजाराचा दिवस असतो. नागरिक शासकीय कामानिमित्त तालुक्याच्यास्थळी येतात. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात सभापती उपसभापती हेही आले होते .दूरवरून कार्यकर्ते आले म्हणून सभापती स्वप्नील श्रावणकर यांनी त्यांना चहासाठी आग्रह धरला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कक्षात शिफायाला बोलावले तिथे एक महिला शिपाई आली. श्रावणकर यांनी इतर पुरुष शिपाई कुठे आहेत अशी विचारणा महिलेला केली असताना तिने आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. यानंतर पंचायत समितीच्या विविध कार्यालयाची सभापती श्रावणकर यांनी खंडविकास अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या या संदर्भात त्यांनी खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांना विचारणा केली असता योग्य माहिती मिळाली नाही. मात्र पंचायत समितीचे काही अधिकारी आणि कर्मचारी मौदा नजीकच्या एका शेतात पार्टी करत असल्याची माहिती यावेळी पुढे आली. या पार्टीत सहाय्यक लेखा अधिकारी मनोज चामाटे, सहाय्यक कक्ष अधिकारी अरविंद मदने आधी उपस्थित होते अशी माहिती आहे.
यासंदर्भात चामाटे यांना विचारणा केली असता कार्यालयीन सहकाऱ्यांनी जेवण ठेवल्याने आपण चार वाजता तिथे गेलो होतो. येथे बाहेरचे पाहुणे येणार होते असे त्यांनी सांगितले. अरविंद मदने म्हणाले आपण या दिवशी रजेवर होतो. याची खंडविकास अधिकाऱ्यांना कल्पना आहे. स्थानिक पत्रकारांनी शेतात जाऊन पाहणी केली असता तिथे त्यांना मटन पार्टी सुरू असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्याही आढळून आल्या.
ही पार्टी अधिकारी कार्मचारि यांना करण्याची का म्हणून घाई आली. हीच पार्टी जर सुटिच्या दिवशी केली असती तर हा प्रकार समोर आला नसता पण ही पार्टी शासकीय कार्यालय सुरु असतांना व अधिकारी व कर्मचारि यांनी यात भर दुपारी शेतात जाऊन पार्टी करण्याचे आयोजन केले परंतु याच पार्टी मधे अजुन कोण कोण सहभागी होणार होते? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.
या घटनेची माहिती खंडविकास अधिकारी यांना फोन द्वारे विचारली असता त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही.
.


हा प्रकार अत्यंतनिंदनीय आहे. घडलेल्या प्रकाराची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे. त्यांनी सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी
स्वप्नील श्रावणकर
सभापती
पंचायत समिती मौदा

Post a Comment

Previous Post Next Post