घरात दडवून ठेवलेला सुगंधित तंबाखू जप्त , कुरखेडा पोलिसांची कढोली येथे कारवाई


कुरखेडा :- तालुक्यातील कढोली येथे एका व्यावसायिकाच्या घरात दडवून ठेवण्यात आलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गोपनीय माहितीवरून छापा मारत कुरखेडा पोलिसांनी जप्त केला. त्या व्यायसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यात कुरखेडानंतर कढोली ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शीतल माने यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने माहिती आहे. अविनाश आकरे याच्या घरी छापा मारला. घरातील एका चुंगडीत सुगंधित तंबाखू दडवून ठेवण्यात आलेला होता. यावेळी पोलिसांनी ४६ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधीत तंबाखू जप्त केला.

आकरे याच्याविरोधात भादंवि कलम २७२, २७३. १८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास हवालदार गौरीशंकर भैसारे करीत आहेत. तालुक्यात सुगंधित तंबाखूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून तालुका मुख्यालयात असलेले काही मोठे व्यावसायिक या अवैध व्यवसायात गुंतलेले आहेत व त्यांच्यामार्फतच तालुक्यातील ग्रामीण भागात सुगंधित तंबाखूचा पुरवठा करण्यात येत असल्याची गोपनीय

कुरखेडा पोलिसानी वक्रदृष्टी करीत या व्यायसायिकांची चौकशी केल्यास प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post