अन...ती पाणपोई ठरली पळसगाव अरतोडी महादेवगड महाशिवरात्रीच्या यात्रेकरुंना वरदान.



श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा व वनपरिक्षेत्र कार्यालय वनविकास महामंडळ वडसा यांचा उपक्रम.

जोगीसाखरा - "पाणी" हा सजीवसृष्टी व निसर्ग समतोलाचा अविभाज्य घटक याच पाण्यासाठी पूर्वीच्या काळात बाबासाहेब आंबेडकर यांना महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह करावा लागला होता. "तहानलेल्या पाणी देणे हा धर्म आहे!" अशी म्हण पूर्वीच्या काळापासून प्रख्यात आहे पण आता हे चित्र बदललं आणि सामाजिक बांधिलकीचा काही अपवाद वगळता सर्वांना विसर पडत असतांनाच सद्याच चित्र आहे. पूर्वीच्या काळात उन्हाळ्याच्या काळात हॉटेल - पानटपरी व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते वाटसरूंना पिण्याचे पाणी म्हणून सामाजिक बांधलकी जोपासत थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करुन घ्यायचे पण आता हे चित्र बदललं आहे. आता मात्र पिण्याच्या पाण्याचा बाटलीबंद व्यवसाय सुरु झाल्याने एरवी सर्वत्र थंड पाण्याचे असणारे राजन (मडके) कुठेही दिसत नाही साधं पाणी पिण्याची आता किंमत मोजावी लागत आहे.
हे सर्वसामान्य भाविक नागरिकांना परवडणारे नाही. ही बाब श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम व देसाईगंज वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल कुळमथे यांनी लक्षात घेत आरमोरी तालुक्यातील पळसगाव अरतोडी महादेवगड पहाडीवर महाशिवरात्रीच्या यात्रेचे औचित्य साधत दि 18 फरवरी ते समारोपिय 26 फरवरी पर्यंत हजारो शिवभक्ताना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा सतत नऊ दिवस उपलब्ध करुन दिली या त्यांच्या सुविधेमुळे तप्त उन्हात महादेव गडावर महाशिवरात्रीनिमित्त यात्रेस येणाऱ्या वाटसरूंना ती पाणपोई वरदान ठरली आहे.
यासाठी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल कुळमथे संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे . श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सचिव गिरीधर नेवारे वनपाल आशिष बायस्कार वनरक्षक निरंजन चौधरी वनरक्षक अशोक तेलंगे वनरक्षक सुकदेव पवार वनरक्षक मनिषा कदम जंकास संस्थेचे सदस्य सुरेश मेश्राम, शेषराव काटेंगे, धर्मा दिघोरे, यादोराव कहालकर, धमराज मरपा, दामोदर मानकर, गोपाल खरकाटे, उज्ज्वला मडावी, गोपिकाबाई कोल्हे, दिवाकर राऊत, सुनिल बावणे, , यांनी परीश्रम घेऊन
गेल्यावर्षी पासुन यात्रेचे स्वरुप पाहता श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा चे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या संकल्पनेतून जनसेवा हीच ईश्वर सेवा व्रत धारण करून महादेव पहाडीवर संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त गडावर येणाऱ्या हजारो भाविकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी पुढाकार घेऊन श्री गुरुदेव जंगल कामगार संस्थाजोगीसाखरा व वनपरिक्षेत्र कार्यालय वनविकास महामंडळ वडसा च्या वतीने नागरिकांसाठी पिण्याच्या थंड पाण्याची करण्यात उत्तम व्यवस्था करण्यात आली होती तहानलेल्यांना पाण्याची व्यवस्था करणाऱ्या श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा व वनपरिक्षेत्र कार्यालय वनविकास महामंडळ देसाईगंज यांच्या उपक्रमाची सर्वत्र स्तुती होत असून हे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post