निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी,शिवसेना अर्जुनी मोरगाव यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन


अर्जुनी मोरगाव : निवडणूक आयोगाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख चेतनजी दहीकर सहर प्रमुख प्रकाश उईके विधानसभा प्रमुख संजय पवार नरेश बोरकर गुलाब गोटेफोडे ममताताई पवार तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार अर्जुनी मोर यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना संपूर्ण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांच्या सह्यांचे पत्र राष्ट्रपती महोदयांना दिले निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा संपूर्ण चुकीचा आहे तो मागे घेण्यात यावा ह्या करिता अर्जुनी मोरगाव शिवसेना तालुकाप्रमुख चेतनजी दहीकर यांच्या पुढाकारातून प्रथमच अर्जुनी मोरगाव तालुक्यातून तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना या निवेदनाद्वारे कळविण्यात आले सदर निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेना तालुका च्या वतीने होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post