देसाईगंज येथे दिव्यांग रुग्णांचे तपासणी शिबिर ५२५ रुग्णांनी घेतला उपचार ।


आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली च्या वतिने देसाईगंज येथिल ग्रामिण रुग्णालयात दिव्यांग रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन २० फरवरी ला करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेञाचे आमदार क्रिष्णाभाऊ गजबे यांचे हस्ते पार पडले या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुढे उप मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंन्द्र भुयार प्रभारी गटसाधन विकास अधिकारी धिरज पाटिल ग्रामिण रुग्णालय देसाईगंज चे वैद्यकिय अधिक्षक डॉ अविनाश मिसार प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगी चे वैद्यकिय अधिकारी डॉ अशोक गहाणे यांचेसह वैद्यकिय विभागाचे कर्मचारी आशा वर्कर ग्रामसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलतांना आम क्रिष्णाभाऊ गजबे म्हणाले की गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागाच्या वतिने दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन देसाईगंज येथिल ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले ही अतिशय प्रसंशनिय बाब आहे दिव्यांग रुग्णाचे विविध प्रकार असुन तज्ञ वैद्यकिय अधिकार्यांच्या वतिने त्यांना योग्य सुविधा व मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातुन प्राप्त होत आहे राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ही या माध्यमातुन दिव्यांग रुग्णांना मिळणार असुन या रुग्णांना शारिरिक विकलांग प्रमाणपञ ही मिळणार आहे अश्या रुग्णांना समाजात उपेक्षित जिवनमान जगण्याची वेळ येवु नये यासाठी राज्य शासनाने हे धोरणात्मक पाउल उचलले असुन या शिबिराच्या माध्यमातुन देसाईगंज तालुक्यातिल सर्व दिव्यांग बांधवांना सेवा व सुविधेचा लाभ होईल असे आम क्रिष्णा गजबे यांनी या प्रसंगी व्यक्त केले या शिबिरात ५२५ दिव्यांग रुग्णांनी तपासणी व उपचाराचा लाभ घेतला ।

Post a Comment

Previous Post Next Post