शिक्षकाकडून लाच मागणारा केंद्र प्रमुख जाळ्यात गटशिक्षणाधिकारी कार्यालयात खळबळ




तिरोडा:  वैद्यकीय रजेचे देयक काढण्यासाठी ९ हजाराची लाच मागणारा तिरोडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत केंद्र प्रमुख एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही यशस्वी सापळा कारवाई आज जिल्हा परिषद शाळा गांगला येथे करण्यात आली. धनपाल श्रीराम पटले (४७) रा. नेहरु वार्ड तिरोडा असे लाचखोर केंद्रप्रमुख आरोपीचे नाव आहे.

सविस्तर असे की, तक्रारकर्ता भंडारा येथील असून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागात शिक्षक पदावर कार्यरत आहे. तक्रारकर्ता शिक्षक डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान वैद्यकीय रजेवर होता. वैद्यकीय रजेनंतर जानेवारीमध्ये तो कर्तव्यावर हजर झाला. मात्र वैद्यकीय रजा कालावधीचा वेतन काढण्यात आला नाही. यासाठी तक्रारकर्ता शिक्षकाने रितसर गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज केला. वेतन काढण्यास सातत्याने टाळाटाळ होत असल्यामुळे शिक्षकाने

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधला. दरम्यान गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत विषय शिक्षक तथा केंद्र प्रमुख धनपाल श्रीराम पटले यांच्याशी त्यांनी संपर्क केले. वैद्यकीय रजेचे वेतन काढण्यासाठी केंद्र प्रमुखाने १० हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तक्रारकर्ता पटले विरुद्ध शिक्षकाला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे गोंदिया लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची सहनिशा करण्यात आली. तसेच लाच देण्याची ठरविण्यात आले. त्यानुरूप तिरोडा तालुक्यातील गांगला येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत पंचासमक्ष आरोपी केंद्र प्रमुख धनपाल श्रीराम पटले याला ९ हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात
आले. या प्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात आरोपी धनपाल श्रीराम लाचलुचपत कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात उपअधिक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोनि सारंग मिराशी, अतुल तावाडे, विजय खोब्रागडे, संजय बोहरे, संतोष शेंडे, मंगेश कहालकर, संतोष बोपचे, अशोक कापसे, दिपक बटबर्वे यांनी केले.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार चर्चेत

तिरोडा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडला आहे. अशी चर्चा सापळा कारवाईनंतर सुरू झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील आरोपी सोबत आणखी काही अधिकारी, कर्मचारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लाचलुचपत विभाग या प्रकरणाच्या तपासातून आणखी काही मासे गवसणार का ? याकडे लक्ष लागले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post